माजलगाव | वार्ताहर

 

 

नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महिला उमेदवारामधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिला मिळाला आहे. शेतकन्याच्या लेकीने घेतलेली भरारी माजलगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

आयोगाने 405 पदांसाठी मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. मंगळवारी (दि.28) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधे प्रमोद चौगुले यांनी 622 गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला 116 गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

 

 

सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरवा मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात एमपीएससीपरीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.