कोल्हापूर ढोलताशा पथकासह केरळ आणि विदेशी कलाकारांचा फायर शो ठरला प्रमुख आकर्षण

बीड । वार्ताहर

 



बीडमध्ये सार्वजनिक शिवंजयती उत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य-दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शहरातील संभाजी महाराज क्रीडागंणाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.  



करवीर नाद कोल्हापूर ढोला ताशा पथकासह केरळचे शबरी चेंडे नृत्यु, विदेशी कलाकारांचा फायर शो, पंजबाचा प्रसिद्ध वीर खालसा कला, केरळचे शबरी चेंडे नृत्याने बीडकरांची मने जिंकली. यानंतर व शेवटी 650 वादकांनी आपली कला सादर केली. यावेळी माताभगिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्या करिता विशेष आसन व्यवस्था केल्यामुळे तर जागोजागी एलईडी स्क्रीन लावल्यामुळे नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली. यावेळी माता भगिनी ज्येष्ठ बांधव,युवक, युवती यांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती. 



यावेळी आभार मानतांना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेल्या सहकार्‍यांनी बीड मतदार संघातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी, महिलांनी सर्वांनी युद्धपातळीवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे शतश: आभार. यावेळी त्यांनी मानले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणाईचा उत्साह प्रचंड दिसून आला. जागा मिळेल तिथे प्रत्येकाने कलाकारांनी सादर केलेल्या कलाप्रकाराला टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. कार्यक्रम पाहता यावा म्हणून अनेक तरुण चक्क  खुर्च्यांवर उभे राहिले होते. ठिकठिकाणी केलेली स्क्रीनची व्यवस्था यामुळे सर्वदूरपर्यंत थांबून नागरिकांना हा कार्यक्रम पाहता आला.

 

शिवजयंती उत्सव २०२३ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर

 

 

माता जिजाऊ विसरून चालणार नाही-सौ.सुनंदाताई पवार





अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे, अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शेकडो लढय्या लढणारे जाणताराजांची किर्ती हिमलायपेक्षा जास्त आहेे. पण या राजाला संस्कार, विचार, राजशिष्टाचार शिकविणारा आई जिजाऊंना विसरून चालणार नाही असे प्रतिपादन बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त-सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी येथे केले.



बीडचे आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्या कार्यक्रमात मुख्यअतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरूवात आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांने सज्ज अशा शिवजयंतीचा उद्घाटन समारंभ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजन करून पुष्पहार घालुन प्रमुख अतिथी बारामती सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार, आ.संदीप क्षीरसागर सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आणि अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.पृथ्वीराज साठे, बीड जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, संपादक विजयराज बंब, उपसंपादक भागवत तावरे, संपादक शेख तय्यब, कल्याण आखाडे, बबनराव गवते, वैजनाथ तांदळे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी सौ.सुनंदाताई पवार म्हणाल्या, आ.संदीप दादा आणि नेहाताईमुळे बीडच्या शिवजयंतीत येण्याचा योग आला असून अतिशय सुंदर देखणा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा शिवजयंती सोहळा पाहुन मन प्रसन्न झाले आहे. नुसती जयंती साजरी करूनच नव्हे तर 18 पगड जाती धर्माला घेऊन जाणार्या छत्रपती शिवाजी महाराजचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज असून माताभगिणींनी आपल्या मुलांना जिजाऊ प्रमाणे शिकवण द्यावी. यामुळे भविष्यात युवकांच्या माध्यमातून घराघरात शिवबा जन्मास येतील असे ही त्या यावेळी म्हणाल्या. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.