बीड | वार्ताहर
बीड जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची आज मंगळवारी (दि.14) नियुक्ती करण्यात आली आहे.बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असली तरी अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. दरम्यान दीपा मुधोळ-मुंडे यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत त्यांच्याकडून जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न आणि प्रशासकीय कामे वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यानंतर राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती झाली होती. शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी पात्राची स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत यामध्ये सामाजिक संघटना व नागरिकांनाही सहभागी करून घेत एक चांगला उपक्रम नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला. 14 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली करण्यात आली असून जिल्हाधिकारी म्हणून आता दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.सध्या त्या सिडको औरंगाबाद येथे कार्यरत होत्या तेथून त्यांची बीड येथे बदली झाली आहे.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
1. राजेंद्र भोसले, IAS (2008), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
2. दिपा मुधोळ मुंडे, IAS (2011) या आधी औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासक, आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
3. राधाविनोद शर्मा, IAS (2011) या आधी बीडचे जिल्हाधिकारी, आता औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.
4 सिद्धार्थ सालीमथ, IAS (2011) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
5 निधी चौधरी, IAS (2012) या आधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी, आता मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.
Leave a comment