बीड । वार्ताहर
आजादी का अमृत महोत्सवनिमित्त बीड विभागामधील सर्व डाक कार्यालया अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचे विशेष अभियान दि. 9 व 10 फेबु्रवारी रोजी आयोजीत करण्यात आले आहे.
पालकांमध्ये बचतीचे महत्व वाढावे तसेच मुलींचे शिक्षण, भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे, याबाबत डाक कर्मचारी ग्राम पंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये सदरील योजनेचे प्रबोधन करून दि.9 व 10 फेबु्रवारी रोजी विशेष अभियाना दरम्यान संबधित पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडणार आहेत.आठवडी बाजार, मंदिर यात्रा, शाळांमध्ये पालक मेळावे यांच्या माध्यमातून योजना जनसामान्यांना पर्यंत पोहोचावी असे प्रयन्त आहेत.योजनेचे विशेष म्हणजे,फक्त 250 रू.भरून खाते उघडता येते.
खाते उघल्यापासून पुढील 15 वर्षां पर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागते. कमीत कमी 250 व जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत एका आर्थिक वर्षात भरणा करता येतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, बारावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न जमल्यानंतर जमा रकमेतून 50 टक्के रक्कम काढता येते खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम (व्याजासहित) काढून ते खाते बंद करता येते. बीड जिल्हातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे. सर्व जनतेने आपल्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यासाठी आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी योजना खात्यामध्ये दि.9 व 10 फेबु्रवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तरी ईछ्चूक पालकानी लवकरात लवकर आपल्या नजीकच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे आवाहन बीड विभागाचे डाकघर अधीक्षक कुंदन जाधव यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज, मुलीचे जन्म प्रमाण पत्र,मुलीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड व पॅनकार्ड, मुलीचे व पालकांचे 02 फोटो व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागद पत्रे ई. योजनेची सर्व माहिती बीड विभागातील नजीकच्या प्रत्येक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे.
Leave a comment