नर्मदारुपी कन्यांचे पूजन
अखिल भारतीय माँ नर्मदा परिक्रमा सेवा संघाचे महासचिव धनंजय कुलकर्णी(वांगीकर) यांनी नर्मदा जयंती पिंगळे पंचाचे सभागृह बीड येथे साजरी करण्यात आली. यावेळी दिप प्रज्वलन करुन माँ.नर्मदा पूजन व आरती करून नर्मदारुपी कन्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी 41 कन्यांचे पूजन करण्यात आले. त्यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भोजनप्रसादीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 41 कन्यारूपी नर्मदा मातेसह विविध क्षेत्रातील भक्त भाविक व महीला गण बहुसंख्येने उपस्थित होते.
मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात राज्याची जीवनदायींनी असलेली नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते व गुजरात मधील खंबायतचे आखात येथे अरबी समुद्रात मिळते ही पश्चिम वाहिनी नदी असून नर्मदा नदीला महत्व असून शास्त्रामध्ये 18 पुराणे आहेत परंतु सप्त नदीमध्ये फक्त नर्मदा पुराणच आहे व त्यामुळे या नदीला अनन्य साधारण महत्व आहे. नर्मदा नदी ही शिवकन्या असून आदि अनादी कालापासून वाहत आहे व त्यामुळे तिचे पौराणिक महत्त्व आहे. या नदीची मार्कंडेय ऋषींनी पहिली परिक्रमा केली व तेव्हापासून सौंदर्याने नटलेल्या नर्मदा नदीची परिक्रमा करण्याची सुरुवात झाली शास्त्रोक्तरीत्या परिक्रमा ही व्रत साधना आहे.
तीन वर्षे 13 महिने व तीन दिवसाची परिक्रमा होते परंतु हल्लीच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये आपल्या वेळेच्या सोयीनुसार पायी परिक्रमा, दंडवत परिक्रमा, वाहनाने, सायकलवर यात्रा रुपी परिक्रमा करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने साधू संत व वारकरी व इतर क्षेत्रातील देश-विदेशातील लोक नर्मदा नदीची परिक्रमा करतात. या कार्यक्रमास माजी आ. सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, सचिन मुळुक, कुंडलिक खांडे ,संतोष मानूरकर, सुरेश शेटे, रमण बाहेती ,कैलास रामदासी, प्रल्हाद कांबळे ,किशोर जगताप श्याम पडुळे ,शेख निजाम ,झुंजार धांडे, कृष्णा वांगीकर, पोपट पिंगळे, नितीन धांडे ,विवेक पिंगळे, मधुकर धांडे, नंदू पिंगळे ,जयंत वाघ ,गोरख शिंदे ,भिकू शिंदे, विशाल जोशी ,डॉक्टर कपूर नवनाथ पवार, दादासाहेब पवार सचिन शिंदे, गणेश तपासे, मनोज परदेशी, सचिन पिंगळे, पन्हाळकर दाजी ,राधेश्याम सोनी, अनंतराव लांडगे, मुकुंद खडके आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment