जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले अभिनंदन
बीड | वार्ताहर
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे वतीने दिला जाणारा राष्ट्रीय बाल पुरस्कार जिल्हयातील राजुरी ता.जि.बीड रोहन रामचंद्र बहीर (वय 15 वर्ष) यास 2022-23 चा राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहिर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि.23 जानेवारी 2023 रोजी विजय भवन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. जिल्हयातील रोहन रामचंद्र बहीर याने नदीच्या पूरात वाहून जाणारे एकाचे प्राण वाचवुन विशेष शौर्य दाखविल्यामुळे त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख (1,00,000 रुपये) स्मतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रोहन रामचंद्र बहीर यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या ठिकाणी बोलूवन विशेष कौतुक केले व पुढील भविष्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिवीक्षा अधिकारी बीड मंगेश जाधव हे उपस्थित होते.
पुरस्काराची शिफारस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड या कार्यालयाचे वतीने करण्यात आलेली होती. या कामी संतोष राऊत निवासी उपजिल्हाधिकारी, आर.आर .तडवी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी पुरस्काराचे नामकंनासाठी विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यालयाचे मंगेश बबनराव जाधव जिल्हा परिवीक्षा अधिकारी बीड, एस.जे सय्यद वरिष्ठ लिपीकएस.एस.पवार विधी सल्लागार, एम.जी.कोकरे, डी.के.महालंके, क.लि.जावेद अब्दुल गणी टिनमेकर यांनी विशेष सहाय्य केले.
Leave a comment