माजलगाव। वार्ताहर
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा व जालना जिल्हा माहेश्वरी सभे च्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र ट्रेड फेअर या हरी नगर जालना येथे 20,21 व 22 जानेवारी रोजी होणाऱ्या उद्योजक मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे देशभरातील 300 उद्योजकांचे स्टॉल, तसेच जागीतक कीर्तीच्या व्याख्यात्याची युवा उद्योजकांना प्रेरणादायी व्याख्यान, लोन मेळावा या सर्वांचा लाभ माजलगाव सह बीड जिल्ह्यातील युवकांनी घ्यावे असे आवाहन माजलगाव तालुका माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष विनोद जाजू,तालुका सचिव उमेश जेथलिया व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
आज 20 जाने पासून जालना येथे महाराष्ट्र ट्रेड फेअरचा प्रारंभ ढोकं महाराज यांच्या किर्तनाने होणार असून दुपारी 1 पासून उद्योजकते संबंधी विविध विषयांवर सेमिनार आयोजित केली आहेत.जागतिक कीर्तीचे व्याख्याते सोनू शर्मा यांचे सायंकाळी 6 वाजता प्रेरणादायी व्याख्यान आयोजित केले आहे.21 जाने रोजी महिलाना उद्योजक ते विषयी मार्गदर्शन करण्यासाठी विविध उद्योगातील महिला मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.देशभरातील 300 उद्योजकांचे स्टॉल तीन दिवस सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्व समुदायातील व्यापारी उद्योजक युवा वर्गासाठी उपलब्ध राहणार आहेत.माहेश्वरी सभेने जरी या ट्रेड फेअर चे आयोजन केले असले तरी सर्व जाती धर्मातील युवकांसाठी हा एक्स्पो खुला असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजलगाव तालुका सभेचे तालुकाध्यक्ष विनोद जाजू तालुका सचिव उमेश जेथलिया, अखिल भारतीय सदस्य गोविंद बजाज,प्रदेश सदस्य राधेश्याम लोहिया,राजेंद्र इंदानी, जुगलकिशोर झंवर,जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसाद भुतडा,जगदीश चांडक,रमेश बाहेती,जिल्हा सह सचिव विनोद बजाज, संघटन मंत्री डॉ कमलकिशोर लड्डा,रमेश कासट,जगदीश टवाणी,रामेश्वर टवाणी,संतोष जेथलिया,दिलीप रांधड,नवलकिशोर काबरा,राजेंद्र करवा,विकास मालाणी,डॉ श्यामसुंदर काकणी,सागर मानधने,गजानन लाहोटी,राजेंद्र नावदंर व युवा संघटन,महिला संघटन च्या पदाधिकारी यांनी केले आहे.
Leave a comment