राजीम/वृत्तसेवा

गेल्या अनेक वर्षांपासून तेली साहू समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देशात ओबीसीना संख्येनुसार आरक्षण देण्यासाठी जातीय जनगणना करावी ही आग्रही मागणी शासन दरबारी लावून धरली आहे, त्याचप्रमाणे देशात लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी छत्तीसगड राज्याने लावून धरावी अशी मागणी माता राजीम जयंतीच्या निमित्ताने दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी छत्तीसगड येथे केली, छत्तीसगड राज्यामध्ये 45% ओबीसी असून त्यांना फक्त 14 टक्के आरक्षण नोकरी आणि सेवेमध्ये होते राज्य सरकारने हे आरक्षण 14% वरून 27% केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे माजी मंत्री क्षीरसागर यांनी जाहीर आभार मानले

 

यावेळेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, गृहमंत्री ताम्रध्वज साहू उपस्थित होते कार्यक्रमास राज्यातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी छत्तीसगड राज्यामध्ये ओबीसी व तेली समाजाचे राज्य पातळीवरील आरक्षणासहित सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली, कार्यक्रमास खासदार,आमदार माजी खासदार, व समाजाचे छत्तीसगड राज्याचे अध्यक्ष टहलराम साहू,युवा प्रकोष्ठ प्रभारी संदीप साहू व सर्व पदाधिकारी उपस्थित होते, त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या राज्यात महाराष्ट्रीयन तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असून समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी करून तेली समाजासाठी राज्य सरकारने समाजभवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे

तसेच देशभरात साहू समाजाला राजकीय संधी देऊन समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तेली साहू समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे छत्तीसगड येथे भव्य स्वागत करण्यात आले,या कार्यक्रमाला राज्यातून 40 हजार समाज बांधव उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.