बीड । वार्ताहर
क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे आवाहन प्रा.जय दुबाले यांनी केले.बीड शहरातील श्री ज्ञानेश्वर माऊली निवासी गुरुकुल या शैक्षणिक प्रकल्पात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यविषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी गुरुकुलातील विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये चि. चैतन्य प्रशांत देशमुख ,चि. शुभम घोडके,मोहित डरफे ,आदित्य यादव,संस्कार खंडे, विराज लंगडे ,राजविर आगलावे,आकाश वायकर ,विवेक नानवटे,आर्यन रामकुल, अजिंक्य वांजरे, संस्कार खोटे,दिपक ढेरे ,श्रवण खताल,ऋतिक कुरुंद ,सागर गाईवळ, सागर कोठेकर, आदर्श ढेंगे,इत्यादी मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.यावेळी संस्थापक अध्यक्षा सुषमा दुबाले मॅडम ,उपस्थित होत्या .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व स्वागत गीतांनी झाली ,स्वागत गित खंडे संस्कार ,संभाजी पवार यांनी गायले.सुत्रसंचालन चि. संस्कार खंडे ,याने केले ,प्रास्ताविक सानप मॅडम ,आभार प्रदर्शन यादव आदित्य याने मानले ,व कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.mage widgemage widget
Leave a comment