सीईओ अजित पवार यांचे आवाहन, प्रत्येक कुटुंबातील सदस्याला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी मिळणार

 

बीड । वार्ताहर

 

बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे योजना पूर्ण करून गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला 55 लिटर दररोज शुद्ध व गुणवत्तापूर्वक पिण्याचे पाणी नळाने उपलब्ध करून देण्यासाठी जल जीवन मिशन उपक्रम सुरू आहे.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये गुणवत्तापूर्वक व पाणी पुरवठा योजना लवकर पूर्ण करावी असा उद्देश ठेवून केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत जिल्हा पंचतारांकित करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले आहे.जल जीवन मिशन सर्वेक्षण 2023 या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत ते बोलत होते.

बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा 1367 गावांमध्ये करण्यासाठीचे नियोजन झालेले आहे. त्यासाठी आराखडे तयार करणे आराखड्यांना मंजुरी देणे तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे नंतर प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश अशा प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम ग्रामीण पाणीपुरवठाच्या पाच उपविभागामार्फत सुरू करण्यात आलेला आहे. योजना लवकर पूर्ण करणे ग्रामस्थांना तात्काळ 55 लिटर शुद्ध पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे याकरिता स्पर्धात्मक चळवळ निर्माण करण्यासाठी जल जीवन मिशन सर्वेक्षण केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर झालेल्या कामाच्या नोंदीच्या आधारे जिल्ह्याची प्रगती दिसणार आहे त्या आधारे जिल्ह्याची वर्गवारी निश्चित होणार आहे.

 

 

या वर्गवारीमध्ये स्टार ते पाच स्टार प्रमाणे गणना होणार असून सध्या बीड जिल्हा दोन स्टार मध्ये आहे.पाणीपुरवठा योजनांची भौतिक प्रगती पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण आणि प्रत्येक कुटुंबाला मिळणार्‍या पाण्याचे संस्थात्मक नियोजन याच्या आधारे जिल्ह्याचे वर्गीकरण करून क्रमवारी ठरणार आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील पाणीपुरवठा उपविभागामार्फत व नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या अंमलबजावणी सहाय्य संस्था यांना 440 ग्रामपंचायती विभागून दिलेले आहे. तसेच तांत्रिक मार्गदर्शनासाठी नेमलेली पीएमसी ही संस्था जवळपास सहाशे ग्रामपंचायत मध्ये काम करत आहे आणि सर्व कामांचे तांत्रिक त्रयस्थ मूल्यांकन करणारे टाटा कन्सल्टन्सी तसेच खाजगी अभियंते व नळ पाणी पुरवठा योजनांचे ठेकेदार या सर्वांना वेळेत काम पूर्ण करण्याबाबत सूचना केलेल्या असून ग्राम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या मदतीने ग्रामपंचायतीचे काम वेगाने तात्काळ पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याचे सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धाबेकर यांनी दिले आहेत.

 

अधिकाधिक चांगल्या कामाआधारे जिल्हा पंचतारांकित घोषीत होणार-चंद्रशेखर केकाण


प्रत्येक योजनेतून उपलब्ध होणारे 55 लिटर पुरेसे गुणवत्तापूर्वक व शुद्ध पाणी तसेच ग्राम पाणीपुरवठा समितीची स्थापना व त्यांचे प्रशिक्षण, शंभर टक्के नळ जोडणी, लोकवर्गणी ,पाणीपट्टी वसुली , बँक खाते उघडणे इत्यादी बाबीवरून जिल्ह्याचे क्रमवारीता ठरणार आहे. शंभर टक्के पूर्ण करणारे व केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदी केलेल्या ग्रामपंचायत आधारे या स्पर्धेत जिल्हा पंचताराकित घोषीत होणार आहे  अशी माहिती विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर केकाण यांनी दिली.

 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.