बीड | वार्ताहर
गेल्या तीस वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय चळवळीत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या दैनिक लोकप्रश्न चे संपादक दिलीप खिस्ती यांच्या सत्काराचे आयोजन बीड येथे करण्यात आले आहे.6 जानेवारी 2023 रोजी दर्पण दिनानिमित्त माँ वैष्णो पॅलेस येथे सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते खिस्ती यांचा गौरव केला जाणार आहे.
महानगर या प्रथितयश दैनिकातून आपल्या पत्रकारितेला सुरवात करणाऱ्या दिलीप खिस्ती यांनी 1996 मध्ये बीड येथे लोकप्रश्न या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या तीस वर्षाच्या काळात लोकप्रश्न च्या माध्यमातून त्यांनी दिन दलित,वंचितांच्या समस्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले.
येत्या 6 जानेवारी रोजी पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभाग प्रमुख दिनेश रसाळ आणि शिक्षणतज्ञ शेषाद्री डांगे यांच्या हस्ते खिस्ती यांचा गौरव केला जाणार आहे.सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Leave a comment