रस्ता कसा टिकणार?;यंत्रणेचे दुर्लक्ष
नेकनूर । वार्ताहर
पिंपरी, नांदूर चौरस्ता ते बोरगाव बु. कळंबकडे जाणारा पाच किमीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून यामध्ये सध्या साइड पंखा भरणे सुरु असताना अनेक ठिकाणी थोडेसे खोदकाम करीत यामध्ये निकृष्ट दर्जाचा मुरूम भरून थातुरमातुर काम केले जात असल्याने यावर होणारा रस्ता टिकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने गुत्तेदार कामाची वाट लावीत आहे.
मागच्या काही वर्षांपूर्वी मसाजोग ते उत्तरेश्वर पिंपरी, नांदूर, केज चौरस्तापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम झाले पुढील बोरगावच्या दोन्ही बाजूकडे उर्वरित पाच किमीच्या रस्त्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून या ठिकाणी साईड पट्ट्या मुरमाने भरल्या जात असल्या तरी अनेक ठिकाणी खोली न देता वरच्या बाजूला निकृष्ट दर्जाचा मुरूम टाकून काम उरकण्याचा सपाटा सुरू असल्याने यावर रस्ता तयार केला तर तो किती दिवस टिकेल असा प्रश्न बोरगाव ग्रामस्थातून उपस्थित होत असून संबंधिताने साईट पट्ट्या खोल करून त्यामध्ये खरपन डबर भरणे गरजेचे असताना असे न करता काम केले जात आहे याचबरोबर एका ठिकाणी पुलाची आवश्यकता असून ते पाणी बाजूला काढून दिले तरच रस्ता टिकेल यामुळे याकडे अधिकार्यानी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.याबाबत ग्रामस्थ विजय गव्हाणे म्हणाले, अलीकडच्या बाजूचे पाणी रस्त्यावरून पलीकडे जाते. यामुळे या ठिकाणी पुलाची नितांत आवश्यकता आहे नाहीतर काही कालावधीत या ठिकाणी खड्डे पडून पाणी मार्ग काढते. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी रस्ता खराब होईल त्यामुळे अगोदर या ठिकाणी पूल करून पाण्याचा निचरा करावा.
Leave a comment