बीड । वार्ताहर
‘दीर्घायुषी व्हायचे असेल तर न चुकता पळा!’ हे ब्रीद घेवून आझादी का अमृत महोत्सवानिमित्त बीड शहरात 1 जानेवारी रोजी सकाळी सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले आहे.आयएमए, रोटरी क्लब बीड सिटी व सीएनएस फिटनेसच्या वतीने या दौडचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पळणं,चालणं हा जगभर उत्तम व्यायाम मानला जातो. पळण्याने आयुष्य वाढतं, कर्करोग आणि ह्रदयाशी संबंधित आजारांनी होणार्या मृत्युच्या धोक्याचं प्रमाण पळण्याने कमी होते.पळण्याचा व्यायाम करणारे जर इतर शारीरीक व्यायाम करत असतील तर, त्यांच्या अचानक मृत्युच्या धोक्याचं प्रमाण 43 टक्क्यांनी कमी होतं. जे नियमीत पळतात त्यांच्या बाबतीत कॅन्सर होऊन मृत्यू होण्याच्या धोका कमी होतो. पळण्याने ह्रदयाशी संबंधीत गुंतागुंत होऊन होणार्या मृत्यूच्या धोक्याची प्रमाण थेट 45 टक्के ते 70 टक्क्यांनी कमी होतं. पळण्याने मानसिक आरोग्य हे उत्तम राहते, मेंदुसंबंधीत अल्झायमर, पाकिॅन्सन या या आजाराने मृत्यू होण्याच्या धोका कमी होतो.
शरीराचा बांधा आखीव रेखीव राखण्यासाठी,वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही खेळापेक्षा, व्यायामपेक्षा पळण्याचा व्यायाम हा उत्तम. कमरेचा घेर कमी करण्यासाठी पळणं हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.1 जानेवारी रोजी असर्वांना नव्या वर्षाचं स्वागत रनिंग करुन करायचे आहे. धानोरा रोड तुकाराम गुरुजी नगर येथून सद्भावना दौड सुरु होईल. तुम्ही चाला, जॉगिंग करा, धावा पण अंतर पुर्ण करा. मग ते 5 किमी, 10 किमी अथवा 21 किमी असेल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
Leave a comment