चौसाळा | वार्ताहार
येथील मागिल 53 वर्षाची परंपरा असलेला जयहिंद गणेश मंडळाने मागिल दोन वर्षी पासुन अगळी वेगळी परंपरा सुरू केली ती अशी की महीला कार्यकारणी स्थापन केली व मंडळाची पुर्ण धुरा ही महिलाच्या खाद्यावर दिली.
ती त्यांनी अगदी मनोभावे पार पाडली . मंडळाच्यावतीन विवीध समाजप्रबोधन पर उपक्रम राबवण्यात आले. त्याचबरोबर कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्धाचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने किर्तन महोत्सव हा विशेष महत्वाचा ठरला नव्हें नव्हें तर एक केंद्र बिंदु ठरला.या किर्तन महोत्सवात किर्तन महोत्सवात ह.भ.प. नामदेव बापु महाराज कवडे , ह.भ.प.श्री.आदिनाथ महाराज लाड ,ह.भ.प.श्री. प्रविण महाराज गोसावी,ह.भ.प.श्री. सोनाली (ताई) महाराज सागडे , ह.भ.प.श्री. भरत महाराज जोगी ,ह.भ.प.श्री. साध्वी सोनाली (ताई) महाराज करप ,ह.भ.प.श्री. दत्तात्रय महाराज अंबिरकर यांची किर्तन सेवा अतिशय समाज प्रबोधनपर झाली. तसेच भारूड सम्राट, ह.भ.प.श्री. महादेव महाराज शेंडे व सहकारी राष्ट्रीय प्रबोधनकार यांचा समाज प्रबोधनपर हास्यविनोदी भारुडाचा कार्यक्रम झाला, किर्तन महोत्सव येशस्वी करण्यासाठी मृदंग विशारत ह.भ.प.श्री.रामेश्वर महाराज जाधव ,गायनाच्या साथीसाठी संगीत विशारद ह.भ.प.श्री.सुमंत महाराज डाके, संगीत विशारद ह.भ.प.श्री.नामदेव बापू महाराज कवडे, ह.भ.प.श्री. सुभाष बप्पा महाराज कवडे ,ह.भ.प.श्री. कृष्णा महाराज मुळे ,ह.भ.प.श्री.रामभाऊ महाराज सर्वज्ञ, ह.भ.प.श्री. मुक्ताताई हिंगणीकर ,ह.भ.प. दत्त पंत महाराज कळाशे, ह.भ.प. जनार्धन महाराज कळाशे, ह.भ.प.श्री. गणेश महाराज गिराम ,ह.भ.प.श्री. खंडेराव महाराज कवडे, ह.भ.प.श्री. विश्रांत महाराज नाईकवाडे, ह.भ.प.श्री.दिगंबर महाराज गिराम हार्मोनियम वादक ह.भ.प.श्री. सुरेश महाराज कदम विनेकरी ह.भ.प.श्री. कल्याण आबा जोगदंड, ह.भ.प.श्री. पोपटराव महाराज नाईकवाडे ह.भ.प.कु. मुक्ताताई वायशे हिंगणीकर तसेच सुलतानपूर ,कानडी घाट ,गोलांग्री व चौसाळा भजनी मंडळ यांनी सहकार्य केले.
त्यांच बरोबर भव्य रक्तदान शिबीरा अंतरगत 43 रक्तदात्यानी रक्तदान केले. . कुसुम हॉस्पिटल बीड डॉ सुनिल गायकवाड व सहकारी यांच्या वतीने अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लस बूस्टर डोस 60 लाभार्थ्याला देण्यात आला .रांगोळी स्पर्धेतुन विविध सामाजिक संदेश देण्यात आले.फॅन्सी ड्रेस स्पर्धा चिञकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा, कृषी मार्गदशन शिबीर सेंद्रीय शेती ,आरोग्य तपासणी शिबीर रक्तदाब व शुगर तपासणी ईत्यादी उपक्रम राबवण्यात आले.
जय हिंद महिला गणेश मंडळ चौसाळा यांच्या वतीने आरतीसाठी आलेल्या सर्व अतिथींना सुंदर असे पुजेचे ताट सप्रेम भेट देण्यात आले. आरती व्यवस्थापक बंडू देवा खडके यांनी अगदी विधिवत पार पाडली. मंडप व्यवस्था व साऊंड सिस्टिम माऊली मंडप चौसाळा श्री.पंजाब राजे राऊत , श्री.बाळासाहेब नाईकवाडे, श्री. सुनील कवडे व त्यांचे सहकारी यांनी वॉटरप्रूफ मंडप लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विसर्जना दिवशी श्री गणपती अथर्वशीर्ष पाठ घेण्यात आला व सामुहीक आरती जयहिंद गणेश मंडळ उत्सव महिला कार्यकारणीच्या सर्व महिला सभासद व आजी माजी सभासद यांच्या हस्ते संपन्न झाली. सामुहीक आरती साठी सर्व महिला व पुरूष यांनी पारंपारीक वेश भुषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विसर्जना पूर्वी, सुलतानपूर ,गोलांग्री व चौसाळा भजनी मंडळ यांनी अभंग, गवळणी ,गणपतीची भक्ती गीते तसेच भावगीते सादर केली. नंतर मंडळाच्या दाम्पत्य सदस्यांनी जोडी जोडीने पावल्या फुकट्या खेळल्या व शेवटी फुलांची उधळण करून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात ओम गं गणपतये नम गणपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. व त्यानंतर महा पंगत झाली व 10 दिवसाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. अशी माहीती मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.गणेश विजय गिराम यानी दिली.
Leave a comment