कोविड -१९ महामारी काळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची ऑफलाइन परीक्षा झाली असल्याने या निकालाची अधिक उत्सुकता आहे. मागील वर्षी राज्यातल्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे त्यांच्या नववी ते अकरावीच्या गुणांच्या आधारे विशिष्ट सूत्रानुसार मूल्यांकन करण्यात आले होते.
यावर्षी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिल्या. करोना काळात लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेकरिता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच काही प्रमाणात अभ्यासक्रमातदेखील कपात करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष करोनामुळे ऑनलाइन अभ्यास करावा लागला होता. वर्षाच्या अखेरीस काहीच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊ लागले होते. त्यामुळे या निकालाची उत्सुकता कायम आहे.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या 9 जुन रोजी बारावीचा निकाल लागणार आहे. कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या निकालाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल दुपारी एक वाजता www. mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या परीक्षेचा सीट नंबर आणि आईचं नाव माहिती असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर त्याच्या दोन-तीन प्रिंट घेऊन ठेवणे आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळेपर्यंत काही दिवस जातात. तोपर्यंत पुढील वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असते.
कुठे पाहाल निकाल?
www.mahahsscboard.in
-
msbshse.co.in
-
hscresult.mkcl.org
-
mahresult.nic.in.
बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या
बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
‘हे’ केलंय ना..?
- संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
- सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
- सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे.
- आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येऊ शकेल
धाकधूक वाढली!
निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..
Leave a comment