अध्यक्षपदी शहादेव नन्नवरे, सचिवपदी भालचंद्र गोस्वामी
बीड । वार्ताहर
जिल्हा वकील संघाच्या सोमवारी (दि.25) झालेल्या निवडणुकीत स्वाभीमान पॅनलने सात पैकी पाच जागा जिंकून वकील संघावर वर्चस्व मिळवले. एकता पॅनलला दोन जागांवर विजय मिळाला. अध्यक्षपदी शहादेव नन्नवरे तर सचिवपदी भालचंद्र गोस्वामी निवडूण आले.
जिल्हा वकील संघाच्या सात पदांसाठी सोमवारी मतदान घेऊन लगेच मतमोजणी करण्यात आली. यात, स्वाभीमान पॅनल आणि एकता पॅनलसह काही अपक्ष असे 19 उमेदवार रिंगणात उतरले होते. सोमवारी दुपारी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणी केली गेली. यात, अध्यक्षपदासाठी शहादेव नन्नवरे यांना 401 मते मिळाली, उपाध्यक्षपदासाठी राहुल साळवे यांना 367 मते मिळाली, सचिवपदासाठी भालचंद्र गोस्वामी यांना 357 मते मिळाली, सहसचिव पदासाठी सुरेश हंगे यांना 341 मते मिळाली तर, महिला प्रतिनिधी म्हणून विद्या गायकवाड यांना 380 मते मिळाली. तर, एकता पॅनलचे रंजित सोनवणे हे 400 मते घेऊन कोषाध्यक्ष झाले तर, किशोर कसबे हे 404 मते घेत ग्रंथपाल सचिव झाले. वकील संघाच्या निवडणुकीत सुशिक्षीत मतदार असतानाही तब्बल 116 मते बाद झाली हे विशेष. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. बालाप्रसाद करवा यांनी काम पाहिले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
Leave a comment