बीडवार्ताहर

सुरुवातीला एकाने लॉजवर नेऊन तर नंतर गावी आल्यावर इतर तिघांनी हातपाय बांधून विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना बीड तालुक्यातील एका गावात समोर आली. या प्रकरणी सोमवारी (दि.25) चार जणांविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

बीड तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विवाहिता पुण्यात वास्तव्याला असते. 11 एप्रिल रोजी गावातीलच अजय गवते याने अहमदनगर येथील एका लॉजवर नेऊन पिडीतेवर बलात्कार केला त्यानंतर 12 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गावातीलच दत्ता मुरलीधर गवते, परमेश्वर नारायण गवते व पप्पू उर्फ आकाश नरहरी गवते यांनी पिडीतेला काटवटवाडी शिवारात नेऊन हातपाय बांधून पप्पू याने बलात्कार केला नंतर तिघांनी पिडीतेला मारहाण करत छेडछाड केली. या प्रकरणी सोमवारी पिडीतेने ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे हे करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.