आष्टी । वार्ताहर
अहमदनगर-जामखेड रोडवरील दशमी गव्हाण येथे कंटेनर व दुचाकीचा अपघात होऊन दोन युवक जागीच ठार झाले. भीषण अपघाताची ही घटना दि.25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही युवक आष्टी तालुक्यातील राहिवासी होत.
दुचाकीवरून नगरकडे जात असलेले महेश छगन गायकवाड (21,रा.कानडी खुर्द,ता.आष्टी) व जयदत अनिल जीवे (23, रा.शिरापूर,ता आष्टी) यांच्या दुचाकीची व कंटेनरची दशमीगव्हाण गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही तरुण जागीच ठार झाले.जयदत्त जिवे हा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करत होता तर महेश गायकवाड हा डिफार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करत होता.या भीषण अपघातात दुचाकीचाही चुराडा झाला. या घटनेने शिरापूर व कानडी गावावर शोककळा पसरली आहे.दुर्दैव म्हणजे जयदत्त जीवे यांच्या बंधूंचे दोन वर्षांपूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
Leave a comment