आष्टी । वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन कि बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधत असतात. एप्रिल महिन्यातील रविवारी 24 एप्रिल रोजी होणार्या या कार्यक्रमात ते कडा येथील महावितरण कंपनीच्या जवळ आणि पाल टाकून राहत असलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध भागातील नागरिकांशी विविध विषयावर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संवाद साधत आहेत. भाजपचे शंकर देशमुख यांनी या पालावर मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. या संदर्भातील माहिती थेट मोदी यांच्यापर्यंत पोहोचली होती. भटक्या कुटुंबातील हे नागरिक असून त्यांच्या समस्या संदर्भात मोदी जाणून घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये बीड जिल्ह्यातून प्रथमच कडा गावाला संधी मिळाली असून याठिकाणी पालावर राहणार्या नागरिकांशी नरेंद्र मोदी संवाद साधनार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. हा मान बीड जिल्ह्यातील कडा या गावाला पहिल्यांदा मिळाला असल्याने नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
Leave a comment