जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांची माहिती
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात येत्या 25 एप्रिल 2022 ते 2 मे 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवला जाणार आहे. यामध्ये 25 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन व 29 एप्रिल 2022 रोजी मॉपअप राऊंड (शिल्लक राहिलेल्या लाभार्थीसाठी) राबवला जाईल. यामध्ये 1 ते 19 वर्षामधील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी द्यावयाची आहे.बीड जिल्हयातील 2 हजार 939 अंगणवाड्यांमध्ये व 3 हजार 12 शासकीय शाळा, शासकिय अनुदानीत शाळा, आश्रमशाळा खाजगी शाळा, विनाअनुदानीत शाळामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 1 हजार 923 आशा स्वयंसेविकामार्फत संस्था स्तरावर व समुदाय स्तरावर (घरोघरी जाऊन) ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये दि.1 ते 5 वी ( 6 ते 10 वर्ष वयोगटातील ) शाळेत जाणारी सर्व मुले-मुली व 6 वी ते 12 वी तील ( 10 ते 19 वर्ष वयोगटातील ) शाळेत जाणारी सर्व मुले-मुली यांना जंतनाशक गोळी द्यावयाची आहे. खाजगी शाळा, शासकिय शाळा,शासकिय अनुदानीत शाळा, आश्रमशाळा विनाअनुदानीत शाळा, आर्मी स्कुल, गुरुकूल, सीबीएससीस्कुल, नवोदय विदयालय सुधारगृह, सर्व इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे , मिशनरी स्कुल, गुरुकूल, संस्कार केंद्रे तसेच महाविदयालयात सर्व कनिष्ठ माहाविदयालय वरीष्ठ महाविदयालयाचे प्रथम वर्षाचे शिक्षक विदयार्थी ( नर्सिंग कॉलेज ) , आय.टी.आय. पॉलीटेक्नीक , इंजिनिअरींग , कला , वाणिज्य , व विज्ञान , फॉर्मसी महाविदयालय , डी.एड. महावियालयामध्ये एकुण 707481 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी दयावयाची आहे. 1 ते 2 वर्षापर्यंतच्या मुलांना अर्धी गोळी व 2 ते 19 वर्षापर्यंतच्या मुलांना 1 गोळी दयावयाची असुन 2 ते 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना पावडर करुन व मोठया मुलांना गोळी चावुन खावयास सांगण्यात आले आहे . तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत सुचित केले आहे . 1 ते 1 9 वर्षामधील सर्व मुला - मुलींनी जंतनाशक गोळी घेणेबाबत आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
Leave a comment