संसारोपयोगी साहित्य जळून खाक

 

माजलगाव । वार्ताहर

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या सिलेंडरचा स्फोट होवून घरातील संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाल्याची घटना 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील नवनाथनगर भागात एका नागरिकाच्या घरात घडली. हा स्फोट इतका मोठा होता की, यात घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नाही.

 


शिवानंद मनोहरराव डहाळे यांचे शहरातील नवनाथनगरमध्ये घर आहे.ते टेलरिंगचा व्यवसाय करुन कुटुंबाची उपजीविका भागवतात. डहाळे यांचे पत्र्याचे शेड असलेले घर आहे. 20 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यात डहाळे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तुंसह, भांडी,कपड्यासह इतर साहित्य जळुन खाक झाले. या स्फोटात किमान 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डहाळे यांच्या शेजारी राहणारे दिनकर जोगडे यांच्या एका खिडकी व दरवाज्याला आगीने झळ पोहचली आहे. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी माजलगाव न.प.च्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले, त्यामुळे शेजारच्या घरांचा आगीपासून बचाव झाला. घटना घडल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत तहसील प्रशासन याठिकाणी पोहचले नव्हते. पोलिसांनी पंचनामा करून कायदेशीर कारवाई पूर्ण केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.