गेवराई । वार्ताहर
शाब्दीक कुरबूरी वाढत गेल्याने झालेल्या वादातून एका तरुणाच्या पोटात चाकूने भोसकल्याची घटना दि.20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे घडली.चाकूहल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
साईनाथ शिवाजी मिठे (35,रा.राजपिंप्री ता.गेवराई) असे जखमीचे नाव आहे.साईनाथ हे दुपारी चारच्या सुमारास शहराजवळ असलेल्या पाढंरवाडी फाट्यावरील हॉटेलजवळ थांबले होते. त्यांचासोबत अन्य एकजण होते.या दोघांत कोणत्यातरी कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे हाणामारीमध्ये रूपांतर होऊन साईनाथ मिठे यांच्या पोटात अन्याताने चाकू भोसकला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांनी पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Leave a comment