बीड | वार्ताहर
बीड शहरात चोरी घरफोडीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. याबरोबरच गंठण चोरीचे गुन्हे अधूनमधून घडत असतात. घरफोडी,जबरी चोरी, दुकानफोडी होत असताना आता चोरट्यांच्या नजरेतून शाळाही सुटेना झाल्या आहेत. शहरातील खंडेश्वरी मंदिर रोड परिसरातील कंकालेश्वर विद्यालयामध्ये चोरट्यांनी हजारो रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरातील खंडेश्वरी मंदिर रोड परिसरात पेठ बीड ठाणे हद्दीत कंकालेश्वर विद्यालय आहे.19 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास तिथे आलेल्या काही चोरट्यांनी सुरुवातीला शाळेच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडले, त्यानंतर शालेय पोषण आहार रुमचे कुलूप तोडून रुममधील एक एलसीडी एम्प्लीफायर मशीन स्पीकर, सिसिंग फॅन, ड्रिल मशीन, होम थिएटर, पाण्याची मोटार, पाण्याची टाकी, असा 38 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अंबादास भानुदास शेकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a comment