भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा
मुंबई :
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे विविध व्हेरिएंट्स पहायला मिळाले. अशातच आता चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट BA2 मुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. परिणामी यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येतेय. दरम्यान भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
एका वेबसाईटशी बोलताना तज्ज्ञ सुभाष साळुंखे म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये देशातील नागरिकांची इम्युनिटी वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. त्यामुळे अधिक चिंता करण्याची गरज नाही.
चिंतेच कारण नसलं तरीही आपण बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. कारण भारतात चौथी लाट येऊ शकते, जसं जगातील अनेक देशांमध्ये आली आहे. चौथी लाट नेमकी कधी येईल आणि ती किती तीव्र असेल याबाबत अजून कल्पना नसल्याचं, साळुंखे यांनी सांगितलं आहे.
मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण
काेराेनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असून आठवड्याला ८ ते १० टक्क्याने केसीस वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांन अधिकाऱ्यांना दिले आहेत. एक पत्रक व्यास यांनी जारी केले आहे.
या वयोगटातील लोकांना धोका
भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1 सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो.मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, असेही ते म्हणाले आहेत. साधारण 70 च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असे मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
Leave a comment