डॉ.सुरेश साबळे यांचे आणखी एक धाडसी पाऊल
रुग्णसेवेत स्त्री रूग्णालय पूर्णपणे सक्षम
बीड । वार्ताहर
जागतिक महिला दिनानिमित्य दि. 4 मार्च 2022 रोजी अंबाजोेगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. लातूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शिबिरांतर्गत 97 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आवश्यकतेनुसार कर्क रोगाचे निदान करणारी पॅप स्मेयर तपासणीदेखील करण्यात आली. स्तनांच्या विविध गाठींचे तपासणी, निदान व उपचार मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तसेच या शिबिराअंतर्गत स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी 9 महिलाची बिनटाक्याची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली.
कोव्हिड-19 संकटकाळात लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयाने पंचक्रोशीतील रुग्णांची सेवा केली आहे. याबरोबरच मागील काही महिन्यांपासून नॉन कॉविड कामाची सुरुवात करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अरुणा केंद्रे यांनी शिबिरासाठी उपस्थित सर्व रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध सुविधांची संपूर्ण माहिती सांगितली.त्याअंतर्गत सोनोग्राफी, रक्त तपासणी, एक्स-रे, ईसीजी तपासणी, बालरोगतज्ञांकडून नवजात शिशु व बालकांची तपासणी, प्रसूतीगृह, कुटुंब नियोजन मार्गदर्शन केंद्र, लसीकरण, सुसज्ज अंतररुग्ण विभाग या सर्व उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुनील जाधव, डॉ.सिद्धेश्वर मुंडे, डॉ. धर्मापाल शिंदे, डॉ.रोहन साखरे, डॉ.स्वाती चव्हाण, डॉ.दिगंबर मुंडे, डॉ दिलीप गायकवाड, डॉ वासंती चव्हाण,अधिपरिसेविका श्रीमती मंगल माने, परिसेविका कुलकर्णी,क्षीरसागर, भट्टे, अधिपरिचरिका सिरसाट, बडे,कुलकर्णी, पवार, फुंदे,मुंडे, मुंढे,दरबस्तवार, मेनकुदळे, बुरांडे, श्रीमती यादव,भोसले,खंदारे कक्ष सेवक मुक्तार, खोमणे, निंगुळे, मेंडके बनसोडे व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.
---------
Leave a comment