मुंबई – देशात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यात मुंबई पुण्यासारख्या शहरात करोनाने पुन्हा एकदा धुकाकूळ घातला आहे. दरम्यान करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. अशावेळी पोलिस प्रशासनावर मोठी जबाबदारी येणार आहे. असे असताना पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाने घेरले आहे. राज्यात आतापर्यंत 9 हजार 510 पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय गेल्या 24 तासात 71 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची लागण होत असल्यामुळे 55 वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ”आपण 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे”. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, मुंबईसह राज्यातील पोलिसांना देखील कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते वर्क फ्रॉम होम करु शकतात. याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानही पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते, तरीही या काळात जवळपास ५०० पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात मुंबई पोलिस दलातील जवळपास १२३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे आता लवकर खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे एम. रामकुमार यांनी सांगितले. पोलिस कर्मचारी कामावर असताना त्यांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी. इतर व्याधी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शक्यतो घरून काम करण्यास सांगावे किंवा लोकांचा संपर्क येणार नाही किंवा कमी संपर्क येईल, अशा ठिकाणी नेमणूक द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आदेश - पोलिस स्टेशनचा आजुबाजूचा परिसर, पोलिस कॉलनी अशा ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून परिसर निर्जंतुक करावा. - पोलिस स्टेशन परिसरात हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवावे. - पोलिसांची वाहने सातत्याने निर्जंतुक करावीत. - पोलिस वसाहतीत सतत वैद्यकीय चाचणी शिबिर घेण्यात यावे. - पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं तातडीने लसीकरण करावे.
Leave a comment