अंबाजोगाई । वार्ताहर
जिल्ह्यात चोरी छुप्या मार्गाने प्रतिबंधीत असलेला गुटखा चढ्या दराने विकला जात आहे. यासाठीच पर जिल्ह्यातून आणि पर राज्यातून लाखोंचा गुटखा येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाला आहे. तालुक्यातील लोखंडी सावरगाव शिवारात पोलीसांनी केलेल्या कारवाईत विविध कंपन्यांचा गुटखा आणि एक कार असा 2 लाख 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 30 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास ही कारवाई झाली.
याप्रकरणी धर्मराज कल्याण भानुदास देशपांडे यांनी फिर्याद नोंदवली. ते अंबाजोगाईत ग्रामीण ठाण्यात हवालदारपदी कार्यरत आहेत. दि.30 डिसेंबर रोजी सकाळी लोखंडी सावरगाव शिवारातून जाणार्या कारला (क्र.एम.एच.डब्ल्यू ए 6883) थांबवून आत तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचा गुटख्याचे पुडे आढळून आले. या कारवाईत कार आणि गुटखा असा दोन लाख 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
----------
Leave a comment