ऑनलाईन गंडा ; पुण्यातील दोघांवर बीडमध्ये गुन्हा
बीड । वार्ताहर
सोशल मीडियावरुन विविध वस्तु आणि वाहने खरेदीचे अमिष दाखवून नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढू लागले आहे. हे लोण आता ग्रामीण भागातही पोहचू लागले आहे. असाच एक प्रकार तालुक्यातील करचुंडी येथे समोर आला आहे. फेसबुकवरुन दुचाकी खरेदी-विक्रीचे अमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली.
सागर बाळु शिंदे (रा.करचुंडी ता.बीड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील दोघांनी त्यास दुचाकी खरेदी विक्री करण्याच्या कारणावरुन दिशाभुल करत सागरकडून 16 हजार 98 रुपये उकळले. 24 नोव्हेंबर रोजी हा सारा प्रकार घडला. याप्रकरणी 20 डिसेंबर रोजी सागर शिंदेच्या फिर्यादीवरुन सचिन गायकवाड व बाळकृष्ण दुधाने (दोघे रा.पुणे) यांच्यावर नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सायबर पोलीस निरीक्षक अधिक रविंद्र गायकवाड तपास करत आहेत.
|
Leave a comment