चार महिन्यानंतर कन्नडहुन गुन्हा वर्ग
बीड:- बीड ते गेवराई दरम्यान बस प्रवास करणार्या एका महिलेच्या बॅगमधील 28 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 च्या सुमारास हा प्रकार घडला होता.
या प्रकरणी निलोफर बेगम हमेद शेख (रा.भंडार गल्ली,बीड) यांच्या फिर्यादीवरुन कन्नड पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला होता. कन्नड पोलीसांनी 20 डिसेंबर रोजी हा गुन्हा बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात वर्ग केला. त्यावरुन आता या गुन्ह्याचा तपास नव्याने केला जाणार आहे.
---------
Leave a comment