विधेयकाचा मतदारांना फायदा काय…??; राजकीय पक्षांचा विरोध का…??

नवी दिल्ली : 

मागील अनेक दिवसांपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू होती, ते "निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक, 2021"(Election Laws Amendment Bill, 2021) सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले.

या विधेयकामध्ये मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक मांडताना सरकारने आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक केल्याने बनावट मतदारांना आळा बसेल यावर भर दिला. त्याला विरोध करण्यासाठी सदस्यांनी दिलेला युक्तिवाद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे मत रिजिजू यांनी व्यक्त केले. 

रिजिजू पुढे म्हणाले की, 1 जानेवारीला नोंदणीसाठी एकच कट ऑफ डेट असल्याने आणि त्यातच नवीन मतदारांची नोंदणी होत असल्याने आजपर्यंत 18 वर्षे उलटून गेल्यानंतरही अनेक लोक मतदानापासून वंचित राहत होते. आता नोंदणीबाबत चार तारखा असतील ज्या 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर असतील. मतदारयादी चांगली असावी अशी आमची इच्छा आहे आणि ती सर्वांना हवी आहे. यामुळेच आम्ही मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करत आहोत. 

विरोधकांचा प्रचंड गदारोळ

Congress, TMC, AIMIM, RSP, BSP या पक्षांनी लोकसभेत हे विधेयक मांडण्यास विरोध केला. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पुर्नविचारासाठी पाठवावं, अशी मागणी काँग्रेसने केली. या विधेयकाच्या माध्यम्यातून लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत.

बोगस मतदानाला लागणार ब्रेक

सरकारने लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला एकाहून अधिक मतदारसंघात नोंदणी करता येणार नाही आणि फसव्या मतदानाला आळा बसेल, असं किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे मतदाराची एक स्वतंत्र्य ओळख निर्माण होणार आहे.

18 वर्षे उलटून गेल्यानंतरही अनेक जण मतदानापासून वंचित राहतात. कारण 1 जानेवारी ही नोंदणीसाठी एकच मुदत तारीख असते आणि त्यादरम्यानच नवीन मतदारांची नोंदणी होते. त्यामुळे वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार नोंदणी करता येत नव्हती. त्यासाठी त्यांना थेट पुढच्या वर्षाची वाट पहावी लागत होती. आता नोंदणीसाठी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार तारखा असतील, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.

मतदारयादी चांगली आणि स्पष्ट असावी अशी आमची इच्छा आहे, यामुळेच आम्ही मतदार यादीशी आधार कार्ड लिंक करत आहोत, असं रिजिजू यांनी म्हटलं. मंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहात निवडणूक सुधारणा विधेयक, 2021 ला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.

काँग्रेसचा विधेयकाला विरोध

काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, आपल्याकडे डेटा संरक्षण कायदा नाही आणि डेटाच्या गैरवापराची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. अशा परिस्थितीत हे विधेयक मागे घेऊन ते संसदेच्या स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवावे, असे चौधरी म्हणाले.

विधेयकाचा मतदारांना फायदा काय…??; राजकीय पक्षांचा विरोध का…??

महत्त्वाचे म्हणजे मतदार कार्ड आधार कार्डची लिंक केल्यामुळे कोणत्याही मतदाराला एकापेक्षा अनेक वेळा मतदार नोंदणी करता येणार नाही.कारण त्याचे मतदार कार्ड आणि मतदार यादी या दोन्ही गोष्टी आधार कार्डशी लिंक केल्यामुळे ते एखाद्या मतदाराने दुसऱ्या ठिकाणी यादीत नाव नोंदवले असले तर स्पष्ट दिसून येईल.ब होण्याचे प्रकार शिल्लक राहणार नाहीत.

आधार कार्डशी लिंक झाल्यामुळे मतदाराची नोंदणी मतदार कार्डावर दिसेल. त्यामुळे बोगस मतदार नोंदणी, दुबार मतदार नोंदणी यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. त्याचबरोबर 18 वर्षाच्या वरचा मतदार वर्षभरातील चार वेळा त्याच्या जन्मतारखेनुसार मतदार यादीत नाव नोंदवू शकेल. या आधी फक्त 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण झालेला मतदाराला फक्त मतदार यादी नाव नोंदवता येत होते. बाकीच्यांना पुढचे वर्षे येईपर्यंत थांबावे लागत होते.

परंतु आता चार टप्प्यांमध्ये मतदारनोंदणी शक्य होणार असल्यामुळे 1जानेवारी, नंतर 1 डिसेंबर पर्यंत कोणत्याही काळात संबंधित मतदाराला 18 वर्षे पूर्ण होणार असतील, तर या टप्प्यामध्ये म्हणजे 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 ऑगस्ट, 1 ऑक्टोबर अशा चार टप्प्यांमध्ये नाव नोंदवता येऊ शकेल. त्यामुळे मतदारांना नवमतदारांना हा मोठा लाभ होणार आहे.

याचा लाभ राजकीय पक्षांना होऊ शकतो. परंतु दुबार मतदार नोंदणी बोगस मतदार नोंदणी रोखली जाणार असल्यामुळे काही राजकीय पक्षांना त्याचा तोटा होऊ शकतो.

निवडणूक सुधारणेमुळे संपणार लिंगभाव विषमता

प्रसार माध्यमांनी फक्त मतदार कार्डाला आधार कार्ड लिंक करणे हाच मुद्दा विरोधकांच्या साक्षीने लावून धरला आहे. परंतु यामुळे सर्वात महत्त्वाची सुधारणा निवडणूक प्रक्रियेत लिंगभाव विषमतेला काढून टाकण्यात झाली असून लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये “वाईफ” हा शब्द आहे, त्या ऐवजी “स्पाऊज” या शब्दाचा समावेश करून लिंगभाव विषमता काढून टाकण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला कुटुंबाची माहिती देताना “पत्नी” हा शब्द येथे वापरला जायचा. त्या ऐवजी आता “स्पाऊज” म्हणजे “जोडीदार” हा शब्द इथे वापरला जाईल. त्यातून स्त्री अथवा पुरुष अथवा अन्य लिंगी यांच्यात भेदभाव राहणार नाही, तर उमेदवाराकङे “व्यक्ती” म्हणून त्याकडे पाहिले जाईल, ही माहिती केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेबाहेर आल्यानंतर पत्रकारांना दिली.

विरोधकांनी मात्र या विधेयकाला विरोध करताना फक्त मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करता कामा नये. त्यातून मतदाराची खासगी ओळख अनावश्यक जाहीर होते असा दावा केला आहे. परंतु त्या पलिकडे जाऊन लिंगभाव विषमता नष्ट करण्याचे महत्त्वाचे काम निवडणूक सुधारणा विधेयकाने केले आहे.

86407802732547?s=20मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याबरोबरच अनेक निवडणूक सुधारणा सुचवणारे महत्त्वाचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या विधेयक मंजुरीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने केंद्रातल्या मोदी सरकारला साथ दिली आहे,

तर बाकी सर्व विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचाही समावेश आहे. मात्र तृणमूल काँग्रेसचे सदस्य या विधेयकावर सरकारच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले आहे. यानंतर हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येईल.

कायदे मंत्री किरेन रिजिजू आज लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केले. विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात आले आहेत. निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बदलांना मंजुरी दिली होती.

या विधेयकामध्ये महत्त्वाचा बदल मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येत आहे. आज मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात मतदार यादीतील नक्कल आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ती ऐच्छिक केले जात आहे. म्हणजेच लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय असेल.

या वर्षी 17 मार्च रोजी लोकसभेत लेखी उत्तर देताना, तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली होती की, निवडणूक आयोगाने आधार प्रणालीला मतदार यादीशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती अनेक वेळा नोंदणी करू शकणार नाही. दुसरा बदल निवडणूक कायद्यातील लष्करी मतदारांच्या समानतेबाबत आहे.

आता ते लिंग तटस्थ केले जात आहे. सध्याच्या कायद्यानुसार, सर्व्हिसमनची पत्नी लष्करी मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहे, परंतु महिला सर्व्हिसमनचा पती नाही. सैनिकी मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली असून सध्याच्या कायद्यामुळे महिला सेवेतील पतींना या सुविधेचा लाभ घेऊन मतदान करता येत नाही.

वर्षातून चार वेळा मतदार नाव नोंदवता येणार

तिसरा बदल नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याशी संबंधित आहे. सध्याच्या कायद्यानुसार, 1 जानेवारीला किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी आहे.

उदाहरणार्थ, जर एखादा युवक 2 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांचा झाला तर त्याला मतदार यादीत नाव जोडण्यासाठी 1 जानेवारी 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. नवीन कायदा लागू झाल्यानंतर, मतदारांना वर्षातून दर तीन महिन्यांनी एक संधी मिळेल, म्हणजे वर्षातून चार संधी मतदार यादीत नाव जोडण्याची मिळणार आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.