नवी दिल्ली :  कायदा मंत्री किरेन रिजिजू आज लोकसभेत  निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर करणार आहेत. विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहे.  निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने  या बदलांना मंजुरी दिली होती. 

सर्वात मोठा बदल मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येत आहे. आज मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात मतदार यादीतील नक्कल आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  एवढेच नाही तर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ते ऐच्छिक केलं जाणार आहे, म्हणजेच ज्याला लिंक करू वाटले तर तर तो करेल. ज्यांना लिंक करु वाटलं नाही तर त्याच्यावर कोणतीच जबरदस्ती नसणार आहे. म्हणजेच लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिला जाईल.

निवडणूक सुधारणा विधेयकामुळे काय बदल होईल

या वर्षी 17 मार्च रोजी लोकसभेत लेखी उत्तर देताना, तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती दिली होती की, निवडणूक आयोगाने आधार प्रणालीला मतदार यादीशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती अनेक वेळा नोंदणी करू नये.  वेगवेगळ्या ठिकाणाहून नोंदणी करू शकणार नाही. दुसरा बदल निवडणूक कायद्यातील लष्करी मतदारांच्या समानतेबाबत आहे. आता ते लिंग  निरपेक्ष केलं जाणार आहे.  सध्याच्या कायद्यानुसार, लष्करात काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नी लष्करी मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहे, परंतु महिला जर लष्करात असेल तर पती पात्र नाही. सैनिकी मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली असून सध्याच्या कायद्यामुळे महिला सेवेतील पतींना या सुविधेचा लाभ घेता येत नाही आणि मतदान करता येत नाही. 

तिसरा बदल नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याशी संबंधित आहे. सध्याच्या कायद्यानुसार, 1 जानेवारीला किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी आहे.  उदाहरणार्थ, जर एखादा युवक 2 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांचा झाला तर त्याला मतदार यादीत नाव जोडण्यासाठी 1 जानेवारी 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. नवीन कायदा लागू झाल्यानंतर, मतदारांना वर्षातून दर तीन महिन्यांनी मतदार यादीत नाव जोडण्याची एक संधी मिळेल, म्हणजे वर्षातून चारवेळा नाव जोडण्याची संधी मिळणार आहे.  

पोस्टल मतपत्रिका 

सुरक्षा दलात काम करणाऱ्या महिलांच्या पतींना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. सध्याच्या तरतुदींनुसार कोणत्याही सैन्याच्या पत्नीला सैन्य मतदार म्हणून नोंदणी करता येऊ शकेल. मात्र, महिला सुरक्षा दलाच्या पतीला हा अधिकार नाही. मात्र, प्रस्तावित विधेयकानंतर संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली जाणार आहे. या कायद्यात पत्नी हा शब्द वगळून त्या ठिकाणी spouse (पती/पत्नी) या शब्दाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 

मतदान ओळखपत्राला आधार कार्ड असं करा लिंक

मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे आता PAN Card प्रमाणे मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावा लागेल. यामुळे बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येण्यास आळा बसेल.  

या निर्णयामुळे अनेकांना Voter ID Card आधार कार्डशी लिंक कसं करायचं याचा प्रश्न पडला आहे. या कामासाठी National Voter Service Portal आणि SMS असे दोन मार्ग अवलंबता येतील. या लेखात आपण या दोन पद्धती जाणून घेणार आहोत.  

  • सर्वप्रथम https://voterportal.eci.gov.in/ या लिंकवर जाणून व्होटर पोर्टल ओपन करा.  
  • त्यांनतर इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा व्होटर आयडी कार्ड नंबर टाका. 
  • त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा  
  • पुढे तुमच्याकडे नाव, पत्ता, वडिलांचं नाव, राज्य, जिल्हा ही माहिती मागितली जाईल.  
  • ही माहिती भरल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा.  
  • त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल.  
  • ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • आता एक पॉप-अप पेज समोर येईल. तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल. 
  • सर्वकाही भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज येईल. 
  • महत्वाची सूचना या पोर्टलवर तुमचं अकॉउंट नसल्यास आधी अकॉउंट क्रिएट करावं लागेल. 
  •  

SMS द्वारे करा आधार कार्डशी व्होटर आयडी कार्ड लिंक  

 

< व्होटर आयडी कार्ड नंबर >< आधार कार्ड नंबर > या फॉर्मेटमध्ये 166 किंवा 51969 या नंबरवर SMS करून देखील तुम्ही व्होटर आयडी कार्डशी आधार लिंक करू शकता.  

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.