आरोग्य,महसूल अन् पोलीस दलानेच घेतला पुढाकार
जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढणार
बीड । वार्ताहर
संपूर्ण राज्यात लसीकरणाची टक्केवारी चांगली आहे. असे असले तरी बीड जिल्ह्यात मात्र कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक कोव्हक्सिन व कोविशिल्ड या लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. जिल्हयातील लसीकरणाचा टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने आज दि. 20 नोव्हेंबर रोजी माजलगाव शहरात आरोग्य विभागासह महसुल व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली.ही विशेष मोहिम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.
या लसीकरण मोहिमेतंर्गत माजलगांव शहरात येणार्या नागरिकांना प्रवेश देतानाच त्यांनी लसीकरणाचे दोन्हीही डोस घेतले किंवा नाही या बाबतची खात्री करण्यात आली. या लोकांनी लसीकरणाचा डोस घेतला नाही अशा जवळपास 350 लोकाना जागेवरच लसीचा डोस देऊन माजलगांव शहरात प्रवेश देण्यात आला. या विशेष लसीकरण माहिमेच्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती निलम बाफना, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे, पत्रकार सुभाष नाकलगांवकर,यादव, झगडे, आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी याची विशेष उपस्थिती होती.सदरील मोहिम यापुढेही चालु ठेवण्यात येणार आहे.
Leave a comment