बीड | वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत येत्या 31 ऑक्टोबर रोजी गट-ड रिक्त पदांसाठी लेखी परिक्षा घेण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात एकुण २२ हजार २०५ उमेदवार परीक्षा देत आहेत.सर्व उमेदवारांना मदत करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. त्यामध्ये दिव्यांग उमेदवारांकरिता लेखनिक नियुक्ती, प्रवेशपत्र निघत नसल्यास त्याबाबत साह्य करणे याबाबतचे कामकाज होईल अशी माहिती परीक्षेचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली शुक्रवारी दिली.
गट-ड रिक्त पदांसाठी बीड जिल्ह्यात एकुण २२ हजार २०५ उमेदवार परीक्षा देत आहेत. यासाठी बीड (३३), अंबाजोगाई (१६), केज (६), माजलगाव (७), गेवराई (९), आष्टी (६) इतक्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.सर्व परिक्षा केंद्रावर कोवीड-१९ बाबत शासकीय मार्गदर्शक सुचनाचे पालन करून परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सर्व उमेदवारांना मदत करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. त्यामध्ये दिव्यांग उमेदवारांकरिता लेखनिक नियुक्ती, प्रवेशपत्र निघत नसल्यास त्याबाबत साह्य करणे याबाबतचे कामकाज होईल. सदर परीक्षा प्रक्रिया ही पारदर्शकपणे होणार आहे. पात्र उमेदवारांनी निर्भयपणे परीक्षा द्यावी. कोणत्याही प्रलोभन किंवा अमिषाला बळी पडू नये असे आवाहन आरोग्य विभागामार्फत व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परीक्षेचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे.
Leave a comment