स्थायी समितीच्या बैठकीत अशोक लोढांनी मांडले महत्वाचे मुद्दे
बीड । वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी जि.प.च्या नूतन इमारत बांधकामात होत असलेल्या निधीच्या अपव्ययाचा मुद्दा उपस्थित करत अतिरिक्त खर्च टाळण्याकडे सत्ताधार्यांचे लक्ष वेधले. याबरोबरच त्यांनी जलयुक्तची कामे, घनकचरा व्यवस्थापन, रमाई घरकुल योजनेचे धनादेश लाभार्थ्यांना तातडीने वितरित करण्याची मागणी केली.
बुधवारी झालेल्या बैठकीत जि.प.चे संबंधित पदाधिकारी, महिला बाल कल्याण सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जि.प.सदस्य अशोक लोढा, वैजनाथ मिसाळ, प्रकाश कवठेकर यांची उपस्थिती होती. सदस्य अशोक लोढा म्हणाले, जि.प.च्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात इटालियन मार्बलचे क्लायडिंग करुन शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात आहे. इटालियन मार्बलला मोठ्या प्रमाणात तडे जातात, या क्लायडिंगसाठी ते लावल्यास एक वर्षाच्या आता निघून जातात, त्यामुळे हे टाळावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेला जि.प.चा निधी बर्या प्रमाणात परत मिळत आहे. तो विभागनिहाय नेमका निधी किती आहे, व तो निधी खर्च करण्यासाठी शासनाची मान्यता घेतली आहे काय, व त्या निधीतून काही विकास कामासाठी निधी खर्च केला आहे काय? असे प्रश्न केले. बरोबरच बैठकीत लोढा यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यात घनकचरा व्यवस्थापन होणे गरजेचे असून त्यादृष्टीने डीपीसीमधून जास्तीचा निधी प्राप्त करुन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी बैठकीत केली.
जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाची त्रयस्त समितीकडून तपासणी न झाल्याने तो निधी कंत्राटदारास मिळत नाही, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्रयस्थ समिती नेमून पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्याबाबत कार्यवाही करण्याकडे लक्ष वेधले. तसेच रमाई घरकुलांना तात्काळ मंजुरी द्यावी.पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर असलेल्या 12ह जार 500 घरकुलांची निवड तात्काळ करुन पहिली यादी घोषित करावी अशी मागणीही जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी केली.
Leave a comment