नवे ४८ नवे रुग्ण, २३ कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाने गत चोवीस तासात २ व जुन्या १ अशा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.तसेच, जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण आढळून आले तर २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.आता जिल्ह्यात ३१० रुग्ण उपचाराखाली आहेत.
गुरूवारी जिल्ह्यातील २ हजार ३५३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात २ हजार ३०५ निगेटिव्ह तर ४८ जण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६, आष्टी ६, बीड १२, गेवराई २, केज १, माजलगाव , पाटोदा ४ व शिरुर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. दिवसभरात २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर चोवीस तासात २ व जुन्या १ अशा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १ लाख २ हजार ७७२ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ९९ हजार ६९१ इतका झाला आहे. आतापर्यंत २ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१० रुग्ण उपचाराखाली आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.दरम्यान जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र मृत्यूसंख्या कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Leave a comment