जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण, ३६ जणांची मात
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे मात्र अजूनही मृत्यूसत्र कायम आहे. गुरुवारी (दि.२३) कोरोनाने २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर नवे ३२ रुग्ण निष्पन्न झाले दरम्यान दिवसभरात ३६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आता जिल्ह्यात ४७० रुग्ण उपचाराखाली आहेत.
बुधवारी जिल्ह्यातील २ हजार २५० संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल गुरूवारी दुपारी मिळाले. यात २ हजार २१८ निगेटिव्ह तर ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १, आष्टी ७, बीड १०, केज ४, माजलगाव ४, पाटोदा ८, आणि शिरुर तालुक्यातील २ रुग्णाचा समावेश आहे.दिवसभरात ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.तसेच गत चोवीस तासात २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.
आता जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा १ लाख २ हजार ४९३ इतका झाला आहे तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९९ हजार २६९ इतकी झाली आहे. आतापर्यंंत २ हजार ७५४ जणांचा बळी गेला आहे. सध्या ४७० रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
Leave a comment