सलग 3 वर्षांपासून धरण 100 टक्के भरले

 

माजलगाव | उमेश जेथलिया

मागील दोन दिवसांपासून बिंदुसरा कुंडलिका व सिंदफणा पात्रात झालेल्या दमदार पावसामुळे पहाटे माजलगाव धरण 100 टक्के भरले आहे. आज सोमवारी सकाळी 7 वाजता 62517 क्यूसेक्स पर सेकंद दराने 11 दरवाजातून दिंडफना पात्रात पाणी सोडण्यात आले.मागील 3 वर्षांपासून धरण दरवर्षी 100 टक्के भरत असून यंदा प्रथमच सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यातच धरण भरले आहे.दोनवर्षा पूर्वी धरणाच्या क्षमतेच्या दुप्पट पाणी धरणातून सोडण्यात आले होते.

माजलगाव धरण परी -क्षेत्रात दमदार झालेल्या पावसाने माजलगाव धरण दि.6रोजी सकाळी 7 पर्यंत धरणाची पाणीपातळी ही 431.40 मी.एवढी असून धरणात पाणीसाठा 431.40 द.ल.घ.मी इतका आहे.तर उपयुक्त पाणीसाठा 312.00/312 दलघमी असून धरणांमध्ये आवक 62 हजार 517 क्यूसेस वेगानं सुरु आहे.तसेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.यावेळी कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर,उपविभागीय अभियंता चौगुले,अभियंता सी.एम.झेंड,एस.डी. कुलकर्णी,यांच्यासह जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.बीड जिल्हयाची जीवनवाहीनी असलेलं माजलगाव धरण क्षेत्रात दमदार पाऊस बरसत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बैल पोळा सणाच्या दिवशी दिलासादायक बातमी आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.