तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली आहे. ते जवळपास 1 तासाहून अधिक काळ या बैठकीत होते. शरद पवार यांनी याआधी पियुष गोयल यांच्याशी भेट घेतली. त्यानंतर ते राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. आणि आता ही नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात पहिल्या टर्ममध्ये सातत्याने भेटी व्हायच्या. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये भेटी कमी झाल्या होत्या. आता ही मोठ्या कालावधीनंतर झालेली भेट आहे. याआधी जूनमध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची भेट झालीय. काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?, असं म्हणत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात मोठं भाष्य केलंय.
मोदी-पवार भेटीवर काय म्हणाले अशोक वानखेडे?
शरद पवार पहिल्यांदा पियुष गोयल यांना भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह यांना भेटले. आता त्यानंतर शरद पवार-मोदी भेट होतीय. या भेटीला निश्चित राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेचा. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते, असं मत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको
महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहित आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं.
पवारांच्या मास्टर प्लॅनला आतापासूनच खिंडार पाडण्याच्या हालचाली?
“सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. भाजपकडून आनंदीबेन पटेल यांचं नाव पुढे केलं जात आहे. त्या मोदींच्या जवळच्या आहेत. 2024 च्या निवडणुकीसाठी शरद पवार देशातील राजकीय नेत्यांची मोट बांधू शकतात. त्यामुळे त्याला आतापासूनच खिंडार पाडण्याच्या हालचाली असू शकतात.”
“शरद पवार तिथे शंका ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मागच्या अधिवेशनावेळी शरद पवार मोदी 40 मिनिटे झाली. त्यावेळी त्यांनी सांगितलं पाऊस पाण्याबद्दल बोललो. मग लगेचच मोदी-शाह भेट झाली. मग त्यानंतर 80 तासांचं सरकार महाराष्ट्रात बनलं. त्यामुळे शरद पवार तिथे शंका आहेच. म्हणून पवार-मोदी भेट ही प्रशासकीय भेट नक्कीच नाही, ती राजकीय आहे. काँग्रेस सोडून सरकार बनवलं जाऊ शकतं का अशी चर्चा असू शकते”
भेटीमागच्या कारणाविषयी निरनिराळे दावे!
ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नसून ती साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. मात्र, दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाल्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल, हे मानण्यास राजकीय विश्लेषक तयार नाहीयेत. विशेषत: या भेटीच्या आधीच पियुष गोयल यांची देखील शरद पवारासोबत भेट झाल्यानंतर पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. नुकतीच पियुष गोयल यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देशातील काही प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. आणि आता शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबं केल्यानंतर त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
देशात २०१४ पासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, २०१९ मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी?
अवध्या दोन दिवसांमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये देशातील करोनाची परिस्थिती, फ्रान्समध्ये नव्याने सुरू झालेली राफेल कराराची चौकशी, देशातील लसीकरणाची अवस्था या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या ‘जाणत्या’ नेत्यासोबत चर्चा करण्याची ही रणनीती असू शकते, असा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात आहे.
Leave a comment