आता अकरवीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची एकच धांदल उडेल.

यंदा परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आल्याने

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे

 

पुणे । वार्ताहर

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लागला. दहावीच्या निकालानंतर मुलांची सीईटी परीक्षांची तयारी सुरु होते. अकरावी सामायिक प्रवेश परीक्षांची  तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली असून अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या १९ जुलै म्हणजेच सोमवार पासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.  राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचा अर्ज उपलब्ध आहे. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही OMR उत्तरपत्रिकांद्वारे घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा ही राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षांचे अर्ज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य असतील. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना यासाठी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

 

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

 

  • राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
  •  
  • विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.
  •  
  • तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.
  •  
  • त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
  •  

 

संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

  • >> अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा

    >> इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा

    >> प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

    >> गुण – 100

    >> बहुपर्यायी प्रश्न

    >> परीक्षा OMR पद्धतीने

    >> परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी

    >> कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?

    >> CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश

    >> CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य

    >> त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश

    >> CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

सीईटी परीक्षांचे स्वरुप कसे असेल?

सीईटी परीक्षा या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येतात. मात्र ही वैकल्पिक म्हणजेच पर्यायी परीक्षा आहे. यात विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ही परीक्षा OMR पद्धतीची असते. एकूण १०० गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. परीक्षा देण्यासाठी २ तासांचा कालावधी देण्यात येतो. CET परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्राध्यान्य देण्यात येते. त्याचप्रमाणे CET परीक्षांच्या गुणांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.

दहावीचा निकाल 99.95 टक्के

यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.

साडे सोळा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले

यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झाली होती. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर करण्यात आले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.