एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही,-धनंजय मुंडेंचा संकल्प
बीड । वार्ताहर
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे.
त्यामुळे या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते परळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 24 तास सेवा देणार्या हातांचा गौरव, ’सेवा गौरव समारोहा’ च्या माध्यमातून पार पडला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यांसह कोरोना काळात सेवा बजावणार्या दूतांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प त्यांनी केला.
दरम्यान भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव -ध.1 तरीळरपीं असं देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची दिली. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंतेत वाढ झाली आहे.महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे.
Leave a comment