बीड | वार्ताहर
केज तालुक्यातील संशोधक शंकर दशरथ दुनघव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयात पी.एच.डी.प्रदान केली आहे. दुनघव यांनी डॉ.शिवकुमार एस.गणपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र या संशोधन केंद्रातून बीड जिल्ह्यातील ‘तृतीयपंथी व्यक्तींना शिक्षण घेताना आलेल्या समस्यांचा अभ्यास’ या विषयावर संशोधन केले आहे. दुनघव हे सध्या महाबळेश्वर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक पदी कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबददल मित्र, आप्तेष्ट आणि सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a comment