आ.प्रकाश सोळंके यांच्य घरासमोर केले लाक्षणिक आंदोलन
माजलगाव/प्रतिनिधी
सलुन व्यावसाय सुरु करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर लाक्षणिक आंदोलन करून त्यांचा मुलगा विरेंद्र सोळंके यांनी निवेदन स्वीकारले व माजलगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भंडारे एक.एन.यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये मिनी लॉकडाऊन ची घोषणा केली आहे आणि त्या लॉकडऊनमध्ये सर्व व्यवसाय सोडून फवत सलून व्यवसाय बंद राहील अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील नाभिक समाजावर हा खुप मोठा अन्याय आहे. पूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये नाभिक समाजातील सलून व्यावसाइकाचे अक्षरशः
कंबरडे मोडलेले आहे. लॉकडाऊन उठल्या नंतर सलून व्यवसाय धारकाने घरातील दाग दागिने विकुन दुकान भाडे,घर भाडे व विज बिलाचा भरना केलेला आहे. तसेच कर्जाचे हप्ते भरतांना समाज मेटाकुटीला आलेला आहे. अशावेळी
परत लॉकडाऊन करुन सलून व्यवसाय वर बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता जगायचे कशे हा प्रश्न नाभिक समाजा समोर पडलेला आहे.
जनतेचे प्रतिनिधी या नात्याने आपण शासनाकडे आमच्या मागण्या संदर्भात लक्ष केंद्रित करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा हि विनंती. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ व त्यामुळे जर विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील.शासनाने सलुन व्यावसायिकांच्या ह्या मागण्या मान्य कराव्यात
सलुन दुकाने पूर्ववत सुरु ठेवन्यास परवानगी द्यावी, सर्व वयोगाटातील सलून कारागिर व व्यवसायकांस तात्काळ कोरोना लस देण्यात यावी,करोना काळातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटूबांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी आदि मागण्याचे निवेदन माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर लाक्षणिक आंदोलन करुन त्यांचा मुलगा विरेंद्र सोळंके यांना निवेदन दिले व तहसीलचे नायबतहसीलदार भंडारे ए.एन. यांना देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, नागेश खटले, सुनिल दळवी, सखाराम झगडे,सागर दळवी, रामदास राऊत, सदाशिव सवने, वसंतराव बहिरे, जगदीश गोरे,कृष्णा काळे,आदी समाज बांधव उपस्थित होते.
Leave a comment