माजलगाव | वार्ताहर
शिक्षक ते उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक या जबाबदारीच्या पदाने श्री सिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थीप्रिय ठरलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंजुळदास गवते यांचे गुरुवार दि.8 रोजी सकाळी 9 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 58 वर्षे होते.मागच्या 12 दिवसांपासून ते औरंगाबाद येथील मेडीकव्हर रुग्णालयात कोरोना वर उपचार घेत होते.चार दिवसांपासून त्यांची प्रकृती उत्तम सुधारत होती.या आजारावर मात करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.तालुक्यातील गोविंदपुर गावचे रहिवासी असलेले गवतेसर श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते.पुढे याच शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत झाले.गणित विषयातील हातखंडासह विद्यार्थ्यात,सहकारी शिक्षकात,व्यवस्थापनात,एक शिस्तबद्ध शिक्षक मुख्याध्यापक म्हणून ते परिचित होते.2015 ते 2019 काळात त्यांनी श्री सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. दरम्यान शाळेने गुणवत्ता,क्रीडा, संस्कृतीक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.मागच्या वर्षी अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयात त्यांची बदली झाली होती.या शाळेतही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.महिनाभरापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते.यावेळी यथोचित सन्मान शाळेकडून करण्यात आला होता.तालुका परिसरात मनमिळावू,मितभाषी म्हणून ते परिचित होते.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.गवते यांच्या दुःखात दै.लोकप्रश्न परिवार सहभागी आहे.
Leave a comment