नियमबाह्य लग्न लावले; नवरा-नवरीसह 300 वर्हाडींवर गुन्हा
नेकनूर । वार्ताहर
धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी विवाहासाठी निवडलेले मांजरसुंबा हे ठिकाण अडचणीचे ठरले. बोहल्यावर चढलेल्या नवरा-नवरीसह विवाहास उपस्थित असणार्या 300 लोकांवर नेकनूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी (दि.7) सायंकाळी सव्वा सात वाजता कारवाईचा दणका दिला.
मांजरसुंबा येथील बीड रोडवर असणार्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून आली. यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आधी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्याकडे फिर्यादीवरून नवरा, नवरी त्यांचे आई-वडील मामा, लग्न लावणारे ब्राह्मण, मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकावर कलम 188 ,269, 270 भा द वि साथरोग आपत्ती व्यवस्थापन या कलमाखाली नेकनूर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक विलास जाधव, यांच्यासह कर्मचार्यांनी केली
Leave a comment