*तब्बल 575 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली*
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात लॉकडाऊन हटवताच बाधितांच्या रुग्णामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आज सोमवारी (दि.५) जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संसर्गाचा उच्चांक गाठला गेला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवसात 575 नवे बाधित रुग्ण निष्पन्न झाले असून बीड तालुक्यासह अंबाजोगाई, आष्टी, केज आणि परळी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे.
रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 2 हजार 255 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यापैकी 1 हजार 680 अहवाल निगेटिव्ह आले तर तब्बल 575 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 150, अंबाजोगाई 127, आष्टी 80, धारुर 11, गेवराई 18, केज 50, माजलगाव 35, परळी 48, पाटोदा 29, शिरुर 24 आणि वडवणी तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान रविवारी जिल्ह्यात 4 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांची संख्या 27 हजार 775 इतकी झाली आहे. पैकी 24 हजार 516 कोरोनामुक्त झाले असून एकूण मृत्यूची संख्या आता 659 झाली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment