एक एप्रिल रोजी लॉकडाऊन झुगारून देणार ....
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा प्रशासनाने दिंनाक २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत दहा दिवसासाठी संपूर्ण बीड जिल्हा दहा दिवसासाठी लाॅकडाऊन के़आ आहे. ईतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी असतानाही लाॅकडाऊनचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न आम्हाला पडला असून जिल्हा प्रशासन लाॅकडाऊनच्या बाबतीत मनमानी करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केला आहे.
मागील एक महिन्यापासून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन नवनवीन नियमावली जाहीर करत आहे श्वपंरतु त्याची कडक अंमलबजावणी करताना प्रशासन दिसुन आले नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पक्षाच्या बैठका मेळावे निवडनुकीयील विजयाचे आनंदोत्सव कोणते ही नियम अटी न पाळता मोठ्या संख्येने घेण्यात आले. याकडे प्रशासनाने सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी सर्व व्यवसाय संध्याकाळी आत ते सकाळी सात पर्यंत बंद रहातील असा आदेश काढण्यात आला पंरतु अनेक दुकाने हॉटेल धाबे हे संध्याकाळी सात नंतर सुरु असायचे याला कुठेही जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध केला नाही. स्वता घालून दिलेल्या नियम व आटींची कडक अंमलबजावणी करण्यास जनतेस भाग पाडले असते तर आज संपूर्ण लाॅकडाऊनची करणायाची गरज जिल्हा प्रशासनाला भासली नसती . गेल्या वर्षभरापासून चालु असलेल्या लाॅकडाऊनच्या खेळामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जिवन उध्वस्त झाले आहे. अनेक मजुर कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तेंव्हा जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे लाॅकडाऊन लागले आहे.
तेंव्हा हे लाॅकडाऊन प्रशासनाने पाच दिवसात मागे घेऊन नियम व अटी कडक निर्बंध यांच्या अंमलबजावणी साठी लक्ष द्यावे जेणेकरुन संपूर्ण लाॅकडाऊनची गरज भासणार नाही अन्यथा वंचित बहुजन आघाडी सर्व व्यापारी लहान उद्योजक कामगार मजुर यांना बरोबर घेऊन लाॅकडाऊन झुगारुन देवु याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा अशोक हिंगे मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी दिला आहे.
Leave a comment