लॉकडाऊनच्या विरोधात व्यापार्‍यांनी दंड थोपटले

संघटनेची बेमुदत बंदची हाक

बीड । वार्ताहर

बीडचे जिल्हाधिकारी जगताप यांनी 25 मार्च पासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या विरोधात बीडमधील व्यापारी संघटनेने दंड थोपटले असून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी बीड यांनी हे लॉकडाऊन केवळ व्यापार्‍यांमुळेच  लादले गेले असल्याचे स्पष्ट केले आहे.
 व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात दि.26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
    सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता आपण संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना आपण बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. प्रशासनाने त्यांचा विचार न करता आपण सरळ लॉकडाऊन करुन मोकळे झाले आहेत. जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस आपण व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत. आपल्या दालनात बोलाविलेल्या व्यापारी प्रतिनिधीच्या बैठकीत असे ठरले होते की, सर्व व्यापार्यांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी व सांगितल्याप्रमाणे जवळपास सर्वच व्यापार्यांनी आपल्या सुचनांचे पालन केलेले आहे. तरी सुध्दा आपण व्यापार्यांची कुठलीच अडचण लक्षात न घेता जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे,  सर्व व्यापार्यांना नियम पाळून व्यापार करण्याची सवलत देण्याचा निर्णय घ्यावा.आपण आदेशात काही  व्यापार्यांना व्यवसाय करण्याची अवधी सकाळी 7 ते 9 या वेळेत दिलेली आहे. आपण दिलेली वेळ व्यापारी व ग्राहकांसाठी सोयीची किंवा योग्य आहे का ? आदेश काढतांना कमीत कमी सामान्य नागरिकांचा तरी विचार करावयास पाहिजे होता परंतु या गोष्टीकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष करुन प्रशासनाने लॉकडाऊन करुन आपली जबाबदारी व्यापारी व नागरिकांवर सोपवून आपण बिनधास्त झालोत ही मानसिकता याच्यातुन प्रकर्षाने दिसते. आपण आदेशित केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास आम्ही सर्व व्यापारी संघटना आपण दिलेल्या आदेशाचा निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व आपण लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असे या निवेदनाव्दारे आपणांस कळवित आहोत. सामान्य नागरिकांच्या गैरसोईस व्यापारी संघटनेचा कुठलाही संबंध राहणार नाही असे आम्ही कळवित आहोत. या संपूर्ण प्रक्रीयेस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले असुन सदरील निवेदन संतोष सोहनी , कार्याध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, विनोद पिंगळे, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, मनमोहन कलंत्री, अशोक शेटे, जवाहरलाल कांकरीया, भास्कर गायकवाड, प्रकाश कानगांवकर, विनोद ललवाणी, भास्कर जाधव, राजेंद्र मुनोत, दिपक कर्नावट, मंगेश लोळगे, सुर्यकांत महाजन, जितेंद्र पढदरीया, किशोर शर्मा, सखाराम शेळके, पारस लुनावत, प्रमोद निनाळ, वर्धमान खिंवसरा, मदनलाल अग्रवाल, जितेंद्र लोढा, गोटु संचेती, लईक अहेमद, हरीओम धुप्पड, अनिल गुप्ता, महेश शेटे, राजेंद्र तापडीया, तसेच माजलगाव येथील अध्यक्ष - सुरेंद्र रेदासणी, सुनील भांडेकर, संजय सोळंके, धनराज बंब, अनंत रुद्रवार, संतोष अब्बड, कपिल पगारीया, मेहता, गणेश लोहीया, परळी येथील अध्यक्ष - माऊली फड, नंदुसेठ बियाणी, संदिप लाहोटी, रिकबचंद कांकरीया, सुरेश आगवान, बबलु कच्ची, रमाकांत निर्मळ, पवार, विष्णु देवशेटवार, गेवराई येथील प्रताप खरात, संजय बरगे, अंबाजोगाई येथील ईश्वरप्रसाद लोहीया, दत्तप्रसाद लोहीया, भारत रुद्रवार, श्रीनिवास हराळे, सुभाष बडेरा, रिकबचंद सोळंकी, पाटोदा येथील अजित कांकरीया, बाळू जाधव, सुभाष कांकरीया, कलीमभाई, केज येथील - महादेव सुर्यंवशी, धारुर - अशोक जाधव, वडवणी -विनायक मुळे, आष्टी-संजय मेहेर, शिरुर-प्रकाश देसर्डा व सह संपूर्ण बीड जिल्ह्यातील व्यापार्‍यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.