जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता शुक्रवारपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता परवानगी शिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून बीड जिल्हयात येणार्या सर्व सिमा सिल, बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश दिनांक 26 मार्च 2021 पासुन ते 4 एप्रिल 2021 या कालावधी पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.या कालावधीत सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या मधून नियमानुसार न्यायिक आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मुभा देण्यात आलेल्या काहींना वगळण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार गुन्हा केला असे मानन्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Leave a comment