बीड । वार्ताहर
शेतकरी कुटुंबातील पहीली जाहीर सामुहिक आत्महत्या करणा-या साहेबराव करपे पाटील कुटुंबियांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकरी विरोधी जाचक कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्या नेतृत्वाखाली आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेख युनुस चर्हाटकर, अजय सरवदे,महंमद जुबेरखान बीडकर,अशोक कातखडे शिरूरकासारकर आदी सहभागी आहेत.
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या प्रेरणेतून व ज्येष्ठ विधिज्ञ अड.महेश भोसले यांच्या मार्गदर्शनात किसानपुत्र आंदोलन चालवले जाते. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी सहकुटुंब केलेल्या आत्महत्येची पहिली शेतकरी आत्महत्या अशी नोंद झालेल्या घटनेची दखल घेत गेली 5 वर्षापासून 19 मार्च रोजी आत्महत्या केलेल्या शेतक-यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी गेली 5 वर्षापासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. दरवर्षी मोठ्याप्रमाणात सामुदायिक पद्धतीने करण्यात येत असलेले आंदोलन यावर्षी कोविड पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आहेत.
Leave a comment