लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
मुंबई :
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर लसीकरण हा पर्याय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच लसीचे जास्तीचे डोस राज्यात पुरवले जावे या मागणीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली. मात्र राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाराष्ट्रात 12 मार्चपर्यंत 52 लाख लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहेत. आता शिवसेनेचे खासदार अधिकच्या लसीची मागणी करत आहेत. कोरोनाकाळात व्यवस्थेचा बोजवारा उडाला आणि लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापन नसल्याचं दिसत आहे."
प्रकाश जावडेकरांच्या ट्वीटला उत्तर देतांना जयंत पाटील यांनी म्हटलं की, लसींबाबतची माहिती माझ्याकडे नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जास्त माहिती आहे. मात्र भारतीयांसाठी लसी कमी पडत असताना आम्हाला इतर देशातील नागरिकांची जास्त आहे. आम्ही आमच्या देशातून पाकिस्तानसह इतर देशांना लस निर्यात करण्याचा जो दानशूरपणा दाखवतोय, त्याचं कौतुक करावं लागेल. भारतात आधी लसीकरण व्हायला हवं होतं. भारतातल्या लसीकरणाकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. पण जगाची देखील काळजी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे भारतीय थोडे मागे राहिले तर चालतील, अशी मानसिकता केंद्राची सध्या दिसते, असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तर आपल्या देशात तयार होणारी लस प्रथम भारतीयांना मिळायला हवी, ती का मिळत नाही याचं उत्तर प्रकाश जावडेकर यांनी द्यावं, असंही जयंत पाटलांनी म्हटलं.
महाराष्ट्रात अधिक लसींचा पुरवठा व्हायला हवा, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत म्हटलं. तर काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेतली. राज्यात एक कोटी 77 लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, 45 वर्षावरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना 2 कोटी 20 लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मात्र आठवड्याला 20 लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे खास अपील केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे की गरजेनुसार कोरोनाची लस देण्यात यावी, त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. यावेळी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी जेणेकरुन कमीत कमी लोकांमध्ये संक्रमण होऊ शकेल.
राजेश टोपेंनी दिले उत्तर
राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून राज्य सरकारने केंद्राकडे आणखी लशीची मागणी केली आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'आधीचा साठा शिल्लक आहे' अशी टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फक्त 10 दिवस पुरेल एवढाच लशीचा साठा असल्याचे सांगितले आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.
'आम्ही राज्यात कोरोना लसीकरणासाठी गती वाढवली आहे. 20 लाख डोस दररोज देण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी मोठाले सेंटर उभारावे लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी परवानगी द्याव्यात, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली.
'ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे लसीकरण केले जात आहे, पण रुग्णालयांकडून प्रतिसाद दिल जात नाही अशा रुग्णालयांची यादी आम्ही केंद्राकडे देणार आहोत', असंही टोपे यांनी सांगितले.
'कोरोनाबाधित रुग्ण ट्रेस करण्यात अडचणी येत आहे. कारण आता सर्वच मोकळे झाले आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग कमी आहे, अशी व्यक्ती जर रेल्वे स्थानकावर गेली तर त्याला ट्रॅक करणे अवघड झाले आहे. आम्ही या सगळ्या अडचणी पंतप्रधान मोदींकडे मांडल्या आहे. कोरोनाची लस देण्यासाठी राज्यात 18080 सेंटर मंजूर करण्यात आले आहे. जवळपास 18 लाख लोकांना लस देण्यात आल्या आहे. यात आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वृद्धांचा समावेश आहे, असंही टोपे यांनी सांगितले.
'आपण 3 लाख लस देण्याच्या गतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी लशीचा पुरवठा मिळणे गरजेच आहे. त्यामुळे 20 लाखांची लशी राज्याला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राजेश भूषण यांना केली आहे. पण, केंद्रीय मंत्र्यांकडून आपल्यावर टीका करण्यात आली आहे की लशीचा साठा उरलेला आहे. पण जर 3 लाख लशी देण्याचे नियोजन केले आहे तर फक्त 10 दिवसांचा लशीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
देशभरात कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. यात 60 वर्षांवरील लोक आणि 45 वर्षांहून अधिक वय असणारे लोक, ज्यांना काही आजार आहेत, ते या दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस घेऊ शकतात. कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं. यासाठी कुठेही न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येतं. लोक कोविन वेबसाईट (CoWIN) किंवा आरोग्य सेतू App द्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही CoWIN App नाही. रजिस्ट्रेशन रोज सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत करता येतं. मिळणाऱ्या स्लॉटवर लसीकरण उपलब्ध आहे.
असं करा रजिस्ट्रेशन -
- सर्वात आधी www.cowin.gov.in वर लॉगइन करा.
- यात आपला फोन नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
- SMS द्वारे फोन नंबरवर OTP पाठवला जाईल.
- OTP टाकून वेरिफाय बटणावर क्लिक करा.
- ओटीपी वेरिफाय झाल्यानंतर Registration of Vaccination पेज दिसेल.
- या पेजवर आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. फोटो आयडी प्रुफ, फोटो आयडी नंबर, जन्म तारीख, लिंग आणि 45 वर्षांवरील लोकांना त्यांना कोणता आजार आहे, हे सांगावं लागेल.
- डिटेल्स भरल्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या रजिस्टरवर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तसा मेसेज येईल.
- एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर सिस्टम, अकाउंट डिटेल्स दाखवेल.
- पेजच्या उजव्या बाजूला दिलेल्या Add More ऑप्शनवर क्लिक करुन याच मोबाईल नंबरने आणखी तुमच्या कोणत्या लोकांना लस घ्यायची आहे, त्यांना Add करता येईल. व्यक्तीचे डिटेल्स टाकून Add बटनवर क्लिक करावं लागेल.
अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी स्टेप्स -
- अपॉईंटमेंट शेड्युल करण्यासाठी अकाउंट डिटेल्स पेजने करू शकतो. त्यासाठी Schedule Appointment वर क्लिक करावं लागेल.
- यानंतर Book Appointment for Vaccination पेजवर पोहोचाल.
- त्यानंतर ड्रापडाउन केल्यावर राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड टाकावा लागेल. सर्च बटण क्लिक केल्यावर वॅक्सिनेशन सेंटरची यादी दिसेल.
- सेंटरचं नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसेल.
- त्यानंतर उपलब्ध स्लॉट (तारीख आणि कॅपेसिटी) दिसेल.
- बुकवर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation पेज येईल.
- त्यानंतर शेवटी डिटेल्स वेरिफाय करुन कन्फर्म बटणवर क्लिक करा.
Leave a comment